For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आठवड्यात एकदा तरी रडा

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आठवड्यात एकदा तरी रडा

लोकांना बोलावून रडविण्याचा प्रकार, रितसर वेबसाइट निर्मित

Advertisement

प्रत्येक माणसात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. कधी तो एखाद्या गोष्टीमुळे आनंदी होतो, तर एखाद्या विनोदानंतर तो जोरजोरात हसू लागतो, परंतु  माणूस कुठल्याही कारणाशिवाय रडूही लागतो. अश्रू ढाळण्यापासून नेहमीच ज्येष्ठांनी रोखले असेल, परंतु वैज्ञानिकांनुसार रडणे तितके वाईटही नसते. आता रितसर वेबसाइट निर्माण करून लोकांना रडण्यासाठी बोलाविले जात आहे. आठवड्यात एकदा रडण्यात काहीच वाईट नसल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. रडणे प्रकृतीसाठी हानिकारक नाही, उलट आठवड्यात एकदा तरी रडावे, हे चांगलेच असते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. या वेबसाइटचे नाव ‘क्राय वन्स अ वीक डॉट कॉम’ ठेवण्यात आले आहे. यात एक खास व्हिडिओ ओपन करा असे सांगत लोकांना इनवाइट केले जातेय. या वेबसाइटवर आणखी अनेक व्हिडिओ असून ते रडविण्याचे काम करतात. याचबरोबर 2018 मध्ये द इंडिपेंडेंटमध्ये प्रकाशित एका लेखाची लिंक देण्यात आली आहे, ज्यात रडविणारे चित्रपट पाहणे मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असून यामुळे तणाव कमी होत असल्याचे लिहिले गेले आहे.

रडणेही आवश्यक

Advertisement

हाइडफ्युमी योशिदानुसार झोपणे आणि हसण्यापेक्षा अधिक चांगले स्ट्रेस बर्स्टर रडणे आहे. दर्दयुक्त गाणी ऐकणे, रडविणारे चित्रपट पाहणे आणि दु:खयुक्त पुस्तके वाचल्याने पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह अॅक्टिव्ह होतात, यामुळे हार्ट रेट मंदावतो आणि मेंदूला दिलासा देणारा प्रभाव निर्माण होतो. आठवड्यात जर तुम्ही एकदा रडत असाल तर जीवन तणावापासून मुक्त होते, अशा स्थितीत वेबसाइट लोकांना रडण्यासाठी आमंत्रित करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.