कच्च्या तेलाच्या उत्पादनात दुप्पटीने वाढ करणार
वेदांताचे सीईओ अग्रवाल यांची माहिती
वृत्तसंस्था / मुंबई
वेदांता ही कंपनी आगामी काळामध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करणार आहे. याकरिता कंपनीने 4 अब्ज डॉलर्स रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. कंपनीचे सीईओ अनिल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
भारत सध्याला 50 टक्के उर्जेचे उत्पादन करतो आहे. तसेच कच्च्या तेलाच्या बाबतीत जगातील तिसऱ्या नंबरचा आयातक देश म्हणूनही भारताचा उल्लेख आहे. वेदांता लिमीटेड ही कंपनी कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये आगामी काळात दुप्पट वाढ करण्याचे नियोजन करीत आहे. यासाठी पुढील तीन वर्षांमध्ये 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.
समभाग
पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनी 1.5 कोटी टन इतके कच्चे तेल प्रतिवर्षाला उत्पादित करणार आहे. सध्याला कंपनी 1 लाख 40 हजार बॅरल प्रतिदिन इतक्या कच्च्या तेलाचे उत्पादन घेते. वेदांताने 1 दशकापूर्वीच स्कॉटलंडची कंपनी केयर्न एनर्जीच्या भारतीय मालमत्तांचे अधिग्रहण केले आहे.