For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्या नरमाईने कच्च्या तेलदरात घट

06:29 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्या नरमाईने  कच्च्या तेलदरात घट
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ला स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. ब्रेंट क्रूड 4.08 डॉलर्सने (4.64 टक्के) घसरून प्रतिबॅरल 83.85 डॉलर्सवर आले. दरम्यान, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाची किंमत 4.01 डॉलरने (4.74 टक्के) घसरून प्रतिबॅरल 80.66 डॉलर झाली आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने इराणवर केलेल्या तीव्र हल्ल्यानंतर आणि तेहरानने ओमानजवळ टँकर्सवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बेंचमार्क्समध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले रोखून सहमती करार करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्याने तातडीने आंतरराष्ट्रीय तेलबाजारात दरकपातीचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.