कच्च्या तेलाचे दर 125 डॉलरपार
06:50 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
मध्यपूर्वेत पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसल्याने जगाच्या बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे दर भडकले आहेत. गुरुवारी तेलाची किंमत प्रतिबॅरल 126 डॉलर्स इतकी झाली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाला प्रारंभ झाल्यापासून तेलाच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. तेलदराची सध्याची पातळी 2023 पासूनची सर्वात उच्च आहे, अशी माहिती तेलबाजार तज्ञांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युद्धाला प्रारंभ झाल्यापासून दरांमध्ये मोठी वाढ होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मध्यंतरी शांतता चर्चा आणि शस्त्रसंधीमुळे दर पुन्हा कमी झाले. मात्र, आता पुन्हा युद्धाचे ढग दिसू लागल्याने दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
Advertisement
Advertisement