महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

9 महिन्यात कच्च्या तेलाची आयात 179 दशलक्ष टनवर

06:24 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisement

2024-25 आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यात भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात बिलात 3.7 टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताने 9 महिन्यासाठी 102.5 अब्ज डॉलर्स मोजले आहेत. आर्थिक वर्षात भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी 98.9 अब्ज डॉलर्स मोजले होते.

Advertisement

एप्रिल ते डिसेंबरच्या कालावधीत देशात 179.3 दशलक्ष टन इतक्या कच्च्या तेलाची आयात करण्यात आली. याआधीच्या वर्षात ही आयात 173.7 दशलक्ष टन इतकी होती. डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या आयात बिलात 6टक्के घसरण होती. देशांतर्गत तेल उत्पादनातली  नरमाई व वाढती मागणी यामुळे यावर्षी कच्च्या तेलाची आयात वाढली आहे.

रशियातून आयात

डिसेंबरमध्ये रशिया  मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश ठरला आहे. एकंदर निर्यातीच्या प्रमाणमध्ये 31 टक्के वाटा रशियातील तेलाचा राहिला आहे. रोजची तेलाची मागणी  1.39 दशलक्ष बॅरल्सवर राहिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia