9 महिन्यात कच्च्या तेलाची आयात 179 दशलक्ष टनवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024-25 आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यात भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात बिलात 3.7 टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताने 9 महिन्यासाठी 102.5 अब्ज डॉलर्स मोजले आहेत. आर्थिक वर्षात भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी 98.9 अब्ज डॉलर्स मोजले होते.
एप्रिल ते डिसेंबरच्या कालावधीत देशात 179.3 दशलक्ष टन इतक्या कच्च्या तेलाची आयात करण्यात आली. याआधीच्या वर्षात ही आयात 173.7 दशलक्ष टन इतकी होती. डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या आयात बिलात 6टक्के घसरण होती. देशांतर्गत तेल उत्पादनातली नरमाई व वाढती मागणी यामुळे यावर्षी कच्च्या तेलाची आयात वाढली आहे.
रशियातून आयात
डिसेंबरमध्ये रशिया मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश ठरला आहे. एकंदर निर्यातीच्या प्रमाणमध्ये 31 टक्के वाटा रशियातील तेलाचा राहिला आहे. रोजची तेलाची मागणी 1.39 दशलक्ष बॅरल्सवर राहिली.