For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कच्च्या तेलाने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला

06:17 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
कच्च्या तेलाने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला
Advertisement

सहा आठवड्यांतील उच्चांक : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी 9 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली. याचे कारण अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

या दरवाढीपूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 98 डॉलर होती. यापूर्वी 24 जुलै रोजी कच्च्या तेलाची किंमत 100 बॅरल प्रति डॉलरवर पोहोचली होती. जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या, तर पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराणचे 5 कच्च्या तेलाचे टँकर नष्ट

तेलाच्या किमतीतील या अलीकडील वाढीचे मुख्य कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील नवीन लष्करी संघर्ष आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून सांगितले की, अमेरिकी सैन्याने इराणचे 5 तेल टँकर नष्ट केले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंदचे प्रमुख कारण

कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद असणे. हा सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. हा धोका लक्षात घेऊन, कोणताही तेल टँकर तेथून जात नाही.

महिनाभरात 22 टक्के वाढले

जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20 टक्क्यांनी येथून जाते. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या 50 टक्के आणि एलएनजीच्या 54 टक्केची खरेदी या मार्गाने करतो. गेल्या 1 महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी ब्रेंट क्रूड 82 डॉलर प्रति बॅरल होते. सरकारी कंपन्यांनी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या होत्या.

मे महिन्यात दरवाढ

मे महिन्यात, आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएलने आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे कारण देत पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीत टप्प्याटप्प्याने एकूण 7.50-7.50 रुपये प्रति लिटरने वाढ केली. या तीन सरकारी कंपन्यांचे देशातील 1 लाखांहून अधिक पेट्रोल पंपांपैकी 90 टक्के पेक्षा जास्त पंपांवर नियंत्रण आहे.

Advertisement
Tags :

.