महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युएईचे युवराज भारतात दाखल

06:03 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन दिवसांचा दौरा : मुंबईच्या बिझनेस फोरममध्ये होणार सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संयुक्त अरब अमिरातचे (युएई) युवराज शेख खालिद बिन जायद अल नाहयान हे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त भारतात दाखल झाले आहेत. युवराज म्हणून अल नाहयान यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. नवी दिल्ली विमानतळावर अल नाहयान यांचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्वागत केले आहे.

या दौऱ्यादरम्यान अल नाहयान यांच्यासोबत अनेक मंत्री आणि एक शिष्टमंडळही आले आहे. यापूर्वी शनिवारी विदेश मंत्रालयाने अल नाहयान यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली होती. विदेश मंत्रालयानुसार अल नाहयान हे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांसंबंधी चर्चा करतील. याचबरोबर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील आणि राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

तर अल नाहयान हे 10 सप्टेंबर रोजी मुंबईचा दौरा करतील आणि एका बिझनेस फोरममध्ये सामील होणार आहेत. या फोरममध्ये दोन्ही देशांचे उद्योजक भाग घेणार आहेत. भारत आणि युएई यांच्यात ऐतिहासिक स्वरुपात मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. अलिकडच्या वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि युएई यांच्यात व्यापक रणनीतिक भागीदारी दृढ झाली आहे. यात व्यापार, गुंतवणूक, राजनयिक, संपर्क, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती सामील असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

युवराजांचा दौरा भारत-युएई संबंधांना बळकट करणार आहे तसेच नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या संधी खुल्या करणार असल्याचेही विदेश मंत्रालयाने नमूद केले आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारीत युएईचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती. तसेच 8 करारांवर स्वाक्षरी केली होती. याचबरोबर भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी एक आंतर-सरकारी व्यवस्था निर्माण करण्यावर सहमती व्यक्त केली होती. मोदींनी स्वत:च्या दौऱ्यात अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन देखील केले होते. तसेच दौऱ्यादरम्यान युवराज अल नाहयान यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article