कंग्राळी, गौंडवाड, शाहूनगर परिसरात देखावे पाहण्यासाठी गर्दी
कंग्राळी बुद्रुक/वार्ताहर
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, शाहूनगर किर्यात परिसरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या विविध रुपात सादर करण्यात आलेले प्रसिध्द देखावे पाहण्यासाठी गल्ल्या नागारिकांनी फुलून गेल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे.
कंग्राळी बुद्रुक येथे 10 ते 12 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. कंग्राळी खुर्द येथे 10 ते 14, अलतगा येथे 4 ते 5, गौंडवाड येथे एक गाव एक गणपती, यमनापूर येथे दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शाहूनगर व साई कॉलनी येथे एक मंडळ अशी एकूण कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरामध्ये जवळपास 40 सार्वजनिक मंडळे आहेत. या सर्व गणेशोत्सव मंडळांनी विविध गणपतीच्या रुपातील गणेशोत्सव देखावे सादर करण्यात आले आहेत.
कंग्राळी खुर्द येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक विलोभनीय देखावे सादर केल्याचे दिसून येत आहेत. कंग्राळी बुद्रुक गावातसुद्धा अनेक विलोभनीय देखावे सादर केल्याची दृश्ये पहावयास मिळत आहेत.
गावातील रस्ते नागरिकांनी फुलले
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, यमनापूर गावातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्यामुळे रस्ते फुलून गेल्याचे दिसून येत आहे.