For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढीपाडव्यासाठी बाजारात गर्दी

11:03 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुढीपाडव्यासाठी बाजारात गर्दी
Advertisement

बेळगाव : गुढीपाडवा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणासाठी रविवारी सायंकाळी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषत: साखरमाळा, फुलांची माळ, कलश, तोरण, मिनी गुढीसह अन्य वस्तूंना मागणी वाढली होती. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. वाढत्या उष्म्यामुळे सायंकाळीच खरेदीला पसंती देण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी बाजारात गर्दी दिसून आली. विशेषत: गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, खडेबाजार आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळाली. त्याचबरोबर रमजानच्या खरेदीसाठी खडेबाजार परिसरात मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदीवर भर दिला जातो. त्यासाठी रेशमी वस्त्र, लहान तांब्याची भांडी, कृत्रिम हार, पाने, माळा आणि साखरगाठी खरेदी करण्यात आल्या. त्याचबरोबर आंब्याच्या डहाळ्या आणि पाना-फुलांना मागणी वाढली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.