For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी

11:12 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
Advertisement

अंगारकी संकष्टी भक्तिभावे; महापूजा, महाआरती

Advertisement

बेळगाव : अंगारकी संकष्टी भक्तिभावे साजरी झाली. शहर आणि उपनगरांतील गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, विशेष पूजा, रात्री चंद्रोदयाला महाआरती, तीर्थप्रसाद वितरण असे कार्यक्रम झाले. वीरराणी चन्नम्मा चौक, संगेळ्ळी रायण्णा चौक, हडलगा रोड, गणपत गल्ली, शहापूर आदी स्थळांवरील गणेश मंदिऱांमध्ये दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती.

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी असते. संकष्टी मंगळवारी आल्यास त्याला विशेष महत्त्व आहे. याला अंगारक संकष्टी असे म्हटले आहे. अंगारक म्हणजे मंगळ. श्री गणपतीने अंगारकाला वर दिला होता की,  तुझे नाव अंगारक हे मानवकुळात कायमस्वऊपी स्मरणात राहील. संकष्टी अथवा अंगारकी संकष्टीचे व्रत केल्यास जीवनात कोणतीच संकटे येत नाहीत. जरी आली तरी त्याचे निवारण होते, अशी धारणा असल्याने महिला व पुऊष हे व्रत श्रद्धेने करीत असतात.

Advertisement

अंगारकीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये सोमवारपासूनच तयारी सुरू होती. मंदिरांसमोर मंडप, विद्युत दिव्यांची आरास करण्यात आली होती. पूजा साहित्याचे स्टॉल, लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल मंदिर परिसरात दिसून येत होते. बाजारात साबू, केळी, सुका मेवा, फळफळावळे, बटाटे व केळीपासून बनविण्यात आलेल्या पदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. अंगारकीनिमित्त काही घरांतून अथर्वशीर्ष पठण झाले. म़ंदिरांतून दिवसभर भाविकांची गर्दी होती. रात्री 9.18 वाजता चंद्रोदय झाल्यानंतर मंदिरांमध्ये महाआरती व तीर्थप्रसाद वितरण झाले.

अंगारकीचा योग

नवीन वर्षातील पहिली अंगारिका तर चालू संवत्सरातील (विश्वावसूनाम) दुसरी अंगारकी हेती. यापूर्वी 12 ऑगस्ट 2025 रोजी अंगारकी होती. येत्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला (दि. 19 मार्च) पराभवनाम या नूतन संवत्सराची सुऊवात होत असून वैशाख महिन्यात अंगारकीचा योग आला आहे. 5 मे 2026 रोजी अंगारकी असेल. ती नूतन संवत्सरातील पहिली तर जानेवारीला सुरू झालेल्या नवीन वर्षातील दुसरी अंगारकी असेल.

Advertisement
Tags :

.