For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहलक्ष्मीच्या रकमेसाठी पोस्टामध्ये गर्दी

12:39 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
गृहलक्ष्मीच्या रकमेसाठी पोस्टामध्ये गर्दी
Advertisement

पोस्ट कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत :  तीन-चार  काऊंटर करून दिली रक्कम

Advertisement

बेळगाव : कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात मंगळवारी तसेच बुधवारी महिलांची मोठी गर्दी झाली होती. गृहलक्ष्मी योजनेचे पैसे पोस्ट खात्यामध्ये जमा होताच ते काढण्यासाठी गर्दी झाली होती. तीन ते चार काऊंटर सुरू करून देखील मोठी गर्दी झाल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागली. राज्य सरकारने मंगळवार दि. 7 रोजी गृहलक्ष्मी योजनेचा 29 वा हप्ता जमा केला. दोन हजार रुपये प्रत्येक महिलेच्या बँक तसेच पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यात आले. डीबीटीद्वारे मोबाईलवर आलेला मेसेज पाहून गृहलक्ष्मीची रक्कम काढण्यासाठी पोस्ट कार्यालयात गर्दी झाली.

गेल्या दोन दिवसांपासून रांगा

Advertisement

पोस्ट कार्यालयाच्या समोरील भागात गर्दी होऊ नये यासाठी मागील बाजूला तीन ते चार काऊंटर करून रक्कम दिली जात होती. अंदाजे 6 ते 7 लाख रुपये रक्कम तीन ते चार दिवसात या काऊंटरवरून दिली जाते. गृहलक्ष्मीची रक्कम काढण्यासाठी दोन दिवसांपासून रांगा लागल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.