तुरुंगात कैद करविण्यासाठी गर्दी
गुन्हा मान्य आहे, बेड्या घालून खावी लागते बिर्याणी
लोक तुरुंगात जाण्यास घाबरतात हे तुम्ही पाहिले असेल. परंतु सिद्दीपेट येथे एक असे हॉटेल आहे, जेथे लोक आनंदाने स्वत:ला ‘कैद’ करवून घेत आहेत. तेलंगणाच्या मैत्री वनम भागात सुरू झालेले ‘जेल मंडी’ हॉटेल सध्या चर्चेत आहे. येथील खाद्यपदार्थांपेक्षा वातावरण चर्चेत आहे, तुरुंगासारख्या कोठड्या, बेड्या, पोलिसांच्या लाठ्या आणि गणवेश येथे दिसून येतो. जर तुम्हाला कुणी तुरुंगात जाऊया असे म्हटले आणि तुम्ही नकार देण्याऐवजी आनंदाने तयार झाला असा प्रकार येथे घडत आहे. या अनोख्या हॉटेलच्या अनोख्या शैलीने लोकांना आकर्षित पेले आहे.
तुरुंगात मोफत एंट्री
या हॉटेलची सर्वात खास बाब म्हणजे येथे खाण्याचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना एका तुरुंग कोठडीत बसावे लागते. तसे येथे कुठलीच बळजबरी नाही, परंतु तुरुंग कोठडीत बसून गरमागरम बिर्याणी फस्त करण्याचा आनंद मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील मिळत नसल्याचे लोकांचे सांगणे आहे. येथील मेन्यूची सर्वात चर्चेत राहणारी डिश ‘चिकन जूसी बिर्याणी’ आहे. जी ग्राहकांना अत्यंत पसंत पडल्याने लोक पुन्हा पुन्हा येत आहेत.
बेड्या घाला, तुरुंगाची हवा खा
सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात केवळ खाणेच पुरेसे नव्हते, जोपर्यंत त्यात काहीतरी वेगळे नसेल. याचमुळे हॉटेलमध्ये केवळ खाण्याचा नव्हे तर मजेशीर फोटोशूटचीही पूर्ण व्यवस्था आहे. लोक पोलिसांचा गणवेश परिधान करून, बेड्या घालून आणि तुरुंगाच्या कोठडीत बसून छायाचित्रे काढून घेत आहेत.
अनोख्या विचाराची कमला
या अनोख्या हॉटेलच्या कल्पनेमागे मल्लिकार्जुन या मालकाची कमाल असून तो स्वत:च्या नवोन्मेषाने लोकांना चकित करण्यास तरबेज आहे. त्याने हॉटेल सुरू करताना केवळ खाद्यपदार्थांवर नव्हे तर त्याच्या अनुभवावरही लक्ष केंद्रीत पेले. आता हे ठिकाण स्थानिक स्तरावर लोकप्रिय ठरले आहे.