कास, वजराई, ठोसेघर परिसरात पर्यटकांची गर्दी
कास :
गेल्या अडीच महीन्या पासुन सतत पडणाऱ्या जोराच्या पावसामुळे कास ठोसेघर बामणोली परळी तापोळा परिसरातील जनजीवन पूर्णपणे गारठले असले तरी पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे सुट्टीच्या दिवशी पावसाळी पर्यटनाचा हंगाम जोरात सुरु असुन पर्यटन स्थळांवर गर्दी पहायला मिळत आहे.
मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस गेली अडीच महीने थांबला नसुन यावर्षी मे महिन्यातच परिसरातील पावसाळी पर्यटनाचे निसर्ग सौदर्य खुलून आल्याने गेली दोन महिन पावसाळी पर्यटन पर्यटकाच्या वाढत्या वर्दळीने जोमात सुरू आहे. कास तलावाच्या सांडव्यावर बांधलेल्या पायऱ्याहून वाहणारे पांढरे शुभ्र पाणी भुशी डॅमच फिल देत असल्याने पर्यटकांची गर्दी दृष्याचा आनंद लुटण्यासाठी होताना दिसत आहेत काही जण पाण्याचा प्रवाह कमी असला की पाण्यात भिजण्याचा आनंदही घेत आहेत.
सर्वात उंचावरून तीन टप्यात कोसळणारा वजराई धबधबा भांबवली, एकीव धबधबा, दुंद धबधबा, केळवली धबधबा, जगप्रसिद्ध ठोसेघर धबधबा या धबधब्यांवर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असुन पर्यटक धबधब्यांसोबतच येथील थंडगार सोसाट्याचा वारा, हिरव्यागार डोंगररांगा गर्द झाडी दाट धुके मुसळधार पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. परिसरातील हॉटेल व्यवसायीकांना अच्छे दिन आले असुन पर्यटक जेवणासोबतच गरमागरम चहा, कणीस शेंगा, भजी वडापाववर ताव मारत आहेत. गेला अडीच महीने पडणाऱ्या पावसाने जरी स्थानिक जणजिवन पुर्णपणे गारठले तरी वाढत्या पर्यटनामुळे रंगत भरल्याचे दिसत आहेत यातुन स्थानिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.