महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुंडीच्या वझरवर पर्यटकांची गर्दी

10:50 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिंब भिजण्यासाठी तरुणाईची पसंती, निसर्ग सौंदर्याची भुरळ

Advertisement

बेळगाव : दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराच्या जवळ असलेले धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. सुंडी (ता. चंदगड) येथील वझर धबधबाही प्रवाहित झाला आहे. त्यामुळे चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. रविवारी धबधब्यावर अबालवृद्धासह पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे वझर धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसून आले. शहरापासून अवघ्या 20 ते 22 कि.मी. असलेल्या सुंडी येथील धबधब्याला काही पर्यटक प्राधान्य देतात. त्यामुळे  शनिवार व रविवार आणि शासकीय सुटीदिवशी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. नैसर्गिकरित्या डोंगराच्या कुशीतून निर्माण झालेला हा धबधबा अलीकडे नावारुपाला आला आहे. त्याबरोबर आजुबाजूला असलेली हिरवळ शेती आणि निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालू लागले आहे. त्यामुळे तरुण-तरुणी सेल्फी घेण्यात दंग होऊ लागले आहेत. शिनोळी मार्गे धबधब्याकडे जाताना रस्त्यात श्रीक्षेत्र वैजनाथच्या मंदिराचे दर्शन होते. त्यामुळे पर्यटकांबरोबर भक्तांची संख्याही धबधब्यावर वाढू लागली आहे. त्यामुळे बेळगाव, खानापूर, चंदगड, आजरा येथील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत.

Advertisement

चंदगड तालुक्यातील धबधब्यांकडे पर्यटकांचा ओघ

वनखाते आणि जिल्हा प्रशासनाने बेळगाव, खानापूर आणि इतर लहान सहान धबधब्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ चंदगड तालुक्यातील धबधब्यांकडे वाढू लागला आहे. सुंडीबरोबर किटवाड येथील धबधब्याकडेही पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article