कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी; दिवसभरात 40 हजारांहून अधिक भक्त

12:24 PM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                            परजिल्ह्यातील भाविकांचा अंबाबाई मंदिरात मोठा ओघ

Advertisement

कोल्हापूर : थंडीच्या वातावरणातही परजिल्ह्यातील भाविक शासकीय सुट्टीचे औचित्य साधून करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात येत आहेत. या भाविकांच्या गर्दीत स्थानिक भाविकांची गर्दीडी मिसळत आहे. दिवसभरात ४० हजारावर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. बहुतांश स्थानिक भाविक मुखदर्शन तर परगावाहून आलेले भाविक हे दर्शन रांगेतून मंदिराच्या जाऊन दर्शन घेताना दिसले.

Advertisement

शनिवार आणि रविवारची शासकीय सुट्टीमुळे परजिल्ह्यातील भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी असते. स्थानिक भाविकही सुट्टीच्यानिमित्ताने महाद्वार रोडसह आजूबाजूच्या बाजारपेठेत खरेदी करुन अंबाबाईचे दर्शन घेतात, अथवा दर्शन घेऊन मग बाजारपेठेतून खरेदी करतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीच्या मंदिरात परगाव आणि स्थानिक भाविकांची संख्या ही इतर दिवसांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी जास्तीची असते. हेच चित्र शनिवारी दिवसभर पाहायला मिळाले.

बोचऱ्या थंडीतही सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पिंपरी-चिंचवड, बारामती, पुणे, मुंबई, मालेगाव, ठाणे, बीड, परभणी, धाराशिव व छत्रपती संभाजीगर येथील भाविक शनिवारी पहाटेपासून कोल्हापुरात येत होते. बिंदू चौक आणि दसरा चौकातील वाहनतळावर वाहने पार्किंग केलेले भाविकांचे जथ्येही पहाटेपासून अंबाबाई मंदिराकडे वळत होते.

सकाळी ९ नंतर तर अंबाबाई मंदिर परिसर एकाच वेळी येत राहिलेल्या भाविकांनी गजबजू लागला होता. दर्शन मंडपही भाविकांनी सतत भरतच राहिला. याचवेळी अंबाबाईचे दर्शन घेतलेले परजिल्ह्यातील भाविक आपआपल्या वाहनांनी पन्हाळगड, वाडीरत्नागिरी, नृसिंहवाडी, खिद्रापूर यासह विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच आणि देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी रवाना होताना दिसत होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेच चित्र अंबाबाई मंदिर आणि परिसरात पाहायला मिळाले. यात्रीनिवासही भाविकांनी हाऊसफुल्ल राहिली होती.

 

Advertisement
Tags :
#ambabaitemple#DevoteesRush#MaharashtraTourism#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#WeekendPilgrimage40k devotees darshanAmbabai temple crowdKolhapur weekend rush
Next Article