For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात नागपंचमीनिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी

12:05 PM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात नागपंचमीनिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी
Advertisement

खानापूर : मंगळवारी नागपंचमी असल्याने सोमवारी खानापूर बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावणातील पहिला सोमवार असल्याने मंदिरातून पूजा, अर्चा करण्यात आली होती. मंगळवारी नागपंचमी असल्याने बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिकांच्या नागपंचमीच्या सणासाठी तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. राजा छत्रपती चौकापासून ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंत दुकानात खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत होती. यात नागपंचमीच्या फराळाचे साहित्य, लाडू, चिवडा यासह पूजेसाठी लागणारे साहित्य व आळू आणि हळदीच्या पानांची विक्री होताना दिसून येत होती. तर काही लोक चिखलाच्या नागमूर्ती खरेदी करताना दिसून येत होते. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असतानाही बाजारात मोठी गर्दी झाली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.