सातार्डा येथे गॅस सिलिंडरसाठी गर्दी
सातार्डा -
सातार्डा येथे गॅस सिलिंडरसाठी सातार्डा व कवठणी गावातील ग्रामस्थांची शुक्रवारी गर्दी उसळली होती.मध्यवर्ती ठिकाण म्हणून ग्रामपंचायतच्या पटांगणात गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून अनुमती देण्यात आली होती.पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडून गॅस सिलिंडर साठा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही गॅस सिलिंडरची मुदत वाढल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ गॅस सिलिंडर वितरणावेळी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.तसेच गॅस सिलिंडर वेळीच मिळत नसल्याने हॉटेल मालकांना काही दिवस हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गॅस सिलिंडर ग्राहकांना देण्यात आले. सातार्डा, कवठणीतील ग्राहकांनी गॅस सिलिंडर नेण्यासाठी गर्दी केली होती.गॅस सिलिंडर वितरणाला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली होती. संध्याकाळी साडेसात वाजता परिसरातील ग्राहकांनी गॅस सिलिंडर ताब्यात घेतले.