मेघालयात जमावाला लाठीमार, अश्रूधूराचा मारा
रामकृष्ण मिशनची शाळा जमावाकडून लक्ष्य
वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयाच्या ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या मावकिनरेव गावात एका निर्माणाधीन रामकृष्ण मिशनच्या शाळेला पाडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 250 जणांचा जमाव या शाळेची इमारत पाडवू पाहत होता. या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. तर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधूराचाही मारा करण्यात आला. तरीही स्थिती नियंत्रणात न आल्याने गावात संचारबंदी लागू करण्यात आली.
रामकृष्ण मिशन स्कूलची स्थापना 2022 मध्ये तत्कालीन गावप्रमुखाने ना हरकत प्रमाणपत्र जारी केल्यानंतर करण्यात आली होती. परंतु वर्तमान गावप्रमुखाने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. संबंधित भूमीवरील ही शाळा अवैध असल्याचा दावा त्याने केला आहे. तर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एकूण 8 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 ग्रामस्थ तर 4 पोलिसांचा समावेश आहे.