नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त गर्दी
11:40 AM Dec 14, 2024 IST
|
Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूर
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" च्या गजरात संपूर्ण नृसिंहवा़डी दुमदुमली आहे. आज सायंकाळी ५ वाजता श्री दत्त महाराजांचा जन्मकाळ साजरा होणार आहे, तरी सर्व दत्त भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा.
कृष्णा नदी आणि पंचगंगेच्या संगमतीरावर दत्तगुरुंच्या बारावर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेल्या या क्षेत्री भाविकांचे दत्त देव संस्थान, नृसिंहवाडी आणि पुजारी मंडळीतर्फे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया येथील गुरुजींनी दिली.
या निमित्त दत्तनगरीमध्ये विविध सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज येथे दत्तभक्तांची जणू मांदियाळीच जमली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article