विठ्ठलच जणू कावळ्याच्या रुपाने येऊन जेवून गेला !
कोल्हापूर
आजवर आपण पोपट ताटात येऊन जेवताना पाहिला आहे. अनेकांच्या घरी पाळीव प्राणी अगदी घरातील सदस्यांप्रमाणे वावरताना पाहिले असतील. पण शित्तुर वारुण येथील द्वारकाधीश आश्रममध्ये चक्क कावळा प्रसाद घेण्यासाठी येतो आणि ताटामध्ये जेवतो. त्यामुळे जणू पांडूरंगच पक्षीरुपात तिथे येऊन प्रसाद घेतो, असे पहिल्यांदाच दिसते आहे.
शित्तुर वारुण येथील द्वारकाधीश आश्रमामध्ये पंढरपूरच्या माघ वारीनंतर पोर्णिमेला उत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी प्रसाद भोजनाचे ही आयोजन करण्यात आले होते. प्रसाद भोजन सुरू असताना अचानक तिथे कावळा आला आणि पंक्तीमध्ये घुसू लागला. दरम्यान त्याला काही वाढपींनी हाकलेल. पण तो बाहेर जाऊन पुन्हा आता आला आणि त्या पंक्तीमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या समोरील ताटातून एक एक घास घेत पुढे गेला.
यावेळी एका मातेने त्याला घास घेण्यास नकार दिला. ती लेकरा जेवू घालत होती. तर त्याने तिच्या ताटातील घास न घेता समोरच्या ताटातील घास घेतला आणि पुढे गेला. कावळा इथेच थांबला नाही, तर हभप बजरंग महारज अण्णा यांनी अखेर स्वतंत्र ताटा प्रसाद वाढून घेतला आणि त्या कावळ्याला अगदी पोटभर जेवू घातले. त्यानंतर तृप्त मनाने तो कावळा उडून गेला. हा कावळा या मठामध्ये नित्याने येणारा पक्षी नसून अचानक त्यादिवशी आला होता. त्यामुळे जणू पांडूरंगच पक्षीरुपात येऊन प्रसादाचा स्विकार करुन गेला, अशी भाविकांची धारणा झाली.