For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पायीच ओलांडले 16 देश

06:06 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पायीच ओलांडले 16 देश
Advertisement

352 दिवसांपर्यंत धावत राहिला

Advertisement

मॅराथॉनपटूंच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु एका हार्डेस्ट गीजर विषयी ऐकल्यावर चकित व्हाल. एका धावपटूने पायीच 16 देश पालथे घातले आहेत. या धावपटूने पूर्ण दक्षिण  आफ्रिकेला पार केले आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारा तो पहिलाच व्यक्ती ठरला आहे. त्याने 7.36 कोटी रुपये देखील चॅरिटीसाठी जमविले आहेत.

ब्रिटनचे मॅराथॉनपटू रसेल कुक यांनी मागील वर्षी 7 एप्रिल रोजी आफ्रेकेचे दक्षिण टोक एल अगुलहास गावातून धावण्यास सुरुवात केली हीत. 352 दिवसांपर्यंत ते सातत्याने धावत राहिले. 16 हजार किलोमीटरचे अंतर त्यांनी कापले असून यादरम्यान त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या, गन पॉइंटवर त्यांना लुटण्यात देखील आहे. फूड पॉइजनिंगमुळे ते आजारी देखील पडले, यशस्वी मोहिमेनंतर जेव्हा ट्युनिशियात फिनिश लाइन पार करत असताना लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आहे.

Advertisement

रसेल कुक यांनी स्वत:च्या प्रवासादरम्यान नामीबिया, अंगोला,  कांगो प्रजासत्ताक, कॅमेरून, नायजेरिया, बेनिन, टोगो, घाना, आयव्हरी कोस्ट, गिनी, सेनेगल, मॉरिटानिया आणि अल्जीरिया या देशांमधून धाव घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना वेगळाच अनुभव प्राप्त झाला आहे. सोशल मीडियावर स्वत:ची छायाचित्रे शेअर करत त्यांनी हा प्रवास कसा झाला याचा तपशील मांडला आहे. रसेल यांनी स्वत:ला हार्डेस्ट गीजर हे नाव दिले आहे. याचा अर्थ स्वत:ला आव्हान देणे आणि काहीतरी अविश्वसनीय करणे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रसेल कुक एकेकाळी मद्य आणि जुगाराच्या व्यसनात अडकले होते. मग त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक समस्या जाणवू लागल्या. अशा स्थितीत त्यांनी स्वत:चे आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याविषयी कळल्यावर अनेक लोक त्यांच्यासोबत जोडत गेले. मी जेव्हा वळून माझ्या आयुष्याकडे बघेन तेव्हा कुठलाच पश्चाताप होणार नाही अशी अपेक्षा असल्याचे कुक यांनी म्हटले आहे. मॅराथॉनद्वारे कुक यांनी 7.3 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमविला आहे. गिव्ह स्टार नावाच्या चॅरिटी प्लॅटफॉर्मद्वारे ही रक्कम जमविण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.