महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रॉस व्होटिंग भीतीने आमदारांना व्हीप?

10:28 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यसभेची उद्या निवडणूक : चार जागांसाठी तिन्ही पक्षांकडून रणनीती

Advertisement

बेंगळूर : राज्यसभेच्या चार जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होऊ नये, यासाठी काळजी घेत असलेले तिन्ही राजकीय पक्ष व्हीप लागू करतील, अशी शक्यता आहे. निवडणुकीत काँग्रेसने तीन तर भाजप आणि निजदने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. मंगळवारी होणाऱ्या मतदानात क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी विविध रणनीती अवलंबल्या जात आहेत. सत्ताधारी काँग्रेसकडून एआयसीसीचे प्रधान कार्यदर्शी अजय माकन, जी. सी. चंद्रशेखर आणि काँग्रेसचे सय्यद नासिर हुसेन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून नारायणसा बांडगे तर निजदकडून माजी राज्यसभा सदस्य कुपेंद्ररेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडे 135 जागा असून तीन उमेदवार सहज जिंकू शकतात. मात्र, कोणताही धोका न पत्करता अपक्ष आमदार जनार्दन रेड्डी, दर्शन पुट्टन्नय्या, लता मल्लिकार्जुन, पुट्टस्वामी गौडा यांना संपर्क साधून त्यांना काँग्रेसला मतदान करण्यासाठी विनंती केली जात आहे. काँग्रेसला यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा सामना करावा लागला आहे. यावेळी हायकमांडने अजय माकन यांना विजयी करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, कोणत्याही उमेदवाराला कोणताही धक्का बसल्यास राजकीय स्थित्यंतरे होतील. यापूर्वी महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत राजकीय उलथापालथ होऊन काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्या कटू अनुभवाच्या जोरावर काँग्रेस नेत्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष घालून रिसॉर्ट राजकारणाचा अवलंब केला आहे विरोधी भाजपही आपल्या आमदारांना उमेदवार नारायणसा बांडगे यांना आणि निजदचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना प्रथम पसंतीचे मत देण्यासाठी व्हीप जारी करणार आहे.

Advertisement

आज काँग्रेस विधिमंडळाची बैठक

कोणत्याही क्षणी संधी मिळाल्यास काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी विरोधक रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे याला थारा देऊ नये, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही रिंगणात उतरले आहेत. सोमवारी अधिवेशनानंतर काँग्रेस विधिमंडळाची बैठक बेंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये होणार आहे. यावेळी कोणत्या आमदारांनी कोणाला मत द्यायचे याच्या सूचना देण्यात येणार आहेत. कोणत्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत द्यायचे आणि कोणत्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीचे मत द्यायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या मतदानात सत्ताधारी आमदारांना आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 45 आमदारांच्या मतांची गरज आहे. प्रत्येक उमेदवाराला 45 मतांप्रमाणे वाटप करून अतिरिक्त असलेल्या अपक्ष आमदारांच्या मतांची बेरीज करून 46 मतांचा उंबरठा ओलांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article