For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोट्यावधींच्या आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश

06:49 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोट्यावधींच्या आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश
Advertisement

छत्तीसगड पोलिसांकडून पुण्यात 26 जणांवर कारवाई : दुबई कनेक्शनही उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगड पोलिसांनी महाराष्ट्रातून 26 सट्टेबाजांना अटक केली आहे. हे सट्टेबाज महादेव, अण्णा रेड्डी, लेजर अशा वेगवेगळ्या दहा अॅपच्या मदतीने आयपीएल सामन्यांवर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावत असल्याचा प्रकार उघड झाल्याचा दावा रायपूर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी पुण्यातील एका फ्लॅटवर छापा टाकत  सट्टेबाजांना अटक केली आहे. या आरोपींचे दुबई कनेक्शनही पोलिसांना आढळून आले आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

आयपीएलमधील सट्टेबाजी रोखण्यासाठी रायपूर पोलीस सातत्याने आरोपींना अटक करत आहेत. सुरुवातीच्या कारवाईत अँटी क्राईम युनिट आणि गंज पोलीस स्थानकाच्या पथकाने रायपूरमध्ये आठ बुकींना पकडले. त्यावरून पुण्यातील दोन वेगवेगळ्या भागात फ्लॅटमध्ये सट्टेबाजीचा मोठा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये व्यवहार सुरू असतानाच सदर सट्टेबाजांनावर अटकेची कारवाई करण्यात आली.

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान बुकींच्या ताब्यातून मोबाईल, लॅपटॉप असे साहित्य आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलवरून 30 कोटींहून अधिक रुपयांच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. मोबाईल आणि बँक खात्यांवरूनही हजारो लोकांची माहिती मिळाली आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान अँटी क्राईम आणि आत्तापर्यंत सायबर युनिटच्या टीमने 9 गुन्ह्यांमध्ये 57 बुकींना अटक केल्याची माहिती रायपूर एएसपी संतोष सिंग यांनी दिली.

पोलीस बनले दूधवाले-भाजीविव्रेते

पोलिसांनी सलग 7 दिवस पुणे येथे तळ ठोकून दूधवाला आणि भाजीविक्रेत्याची भूमिका पार पाडत सट्टा सुरू असलेल्या भागाची रेकी केली. त्यानंतर या बुकींना अटक करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच रायपूरच्या पुरानी बस्ती भागातील पप्पू जेठवानी हा या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. तसेच रायपूर येथील नवीन वैद्य, कोरबा येथील रहिवासी पिंटू, चंपा येथील रहिवासी नयन हे तिघेजण मुरली नामक व्यक्तीच्या संपर्कात असून त्यांचे काही हस्तक दुबईत असण्याची शक्मयता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी पर्दाफाश केलेले सट्टेबाजीचे रॅकेट करोडो रुपयांच्या ऑनलाईन व्यवहारांवर आधारित होते. त्यामुळे विविध बँकांचे अनेक कर्मचारी आता पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांनी बेकायदेशीरपणे अनेक खाती उघडली असून सट्टेबाजांशी जोडलेल्या खात्यांमध्ये कोट्यावधी ऊपयांच्या व्यवहारात मदत केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. प्राथमिक तपासाअंती बँक कर्मचारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे.

Advertisement
Tags :

.