कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पीएफआय’साठी हवालाद्वारे आखातातून करोडोंचा निधी

06:07 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडीचा मोठा खुलासा, भारताविरोधात रचले जात होते कट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित 5 जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पीएफआयमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असून ते परदेशातून हवालाद्वारे मिळालेले कोट्यावधी रुपये देशविरोधी कारवायांमध्ये वापरत होते.

पीएफआयने आखाती देशांमध्ये आणि इतरत्र आपल्या हजारो सक्रिय सदस्यांद्वारे पद्धतशीर पद्धतीने भरीव निधी उभारल्याचे तपासात समोर आले आहे. दहशतवादी कारवाया आणि आयएसआयएससारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी कथित संबंध असल्याबद्दल केंद्राने ‘पीएफआय’वर बंदी घातली होती. अटक करण्यात आलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये पीएफआयच्या संस्थापक सदस्यांपैकी ए. एस. इस्माईल, संघटनेच्या कर्नाटक युनिटचे अध्यक्ष मोहम्मद शकिफ, 2020 पर्यंत राष्ट्रीय सचिव असलेले अनीस अहमद, संघटनेवर बंदी घालण्यात आली तेव्हा राष्ट्रीय सचिव असलेले अफसर पाशा आणि संघटनेचे विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष ई.एम. अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. या सर्वांची बँक खात्यातील कोट्यावधी रुपयांच्या मनी टेलबाबत चौकशी करण्यात आली, मात्र समाधानकारक उत्तरे न दिल्याने आणि वस्तुस्थिती लपवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शकिफ याने कर्नाटकातील पीएफआय संघटनेत राज्य स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले. 2016 ते 20 पर्यंत कर्नाटक युनिटची धुरा त्याच्यावर होती. तसेच राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचा सदस्यही होता. 2020 मध्ये छापेमारी दरम्यान जप्त करण्यात आलेल्या संस्थेची वेगवेगळी बँक खाती, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रे दाखवून या सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली. नोंदवलेल्या जबाबात विरोधाभास आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article