तेलंगणातील छाप्यात कोट्यावधींचे घबाड
महापालिका अधिकाऱ्याच्या घरातून 3 कोटी रोख रकमेसह
वृत्तसंस्था/ निजामाबाद
तेलंगणातील निजामाबाद येथील महापालिका अधिकाऱ्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात 3 कोटी ऊपये रोख आणि 51 तोळे (595 ग्रॅम) सोने जप्त करण्यात आले आहे. महामंडळाचे अधिकारी दसरी नरेंद्र यांनी पलंगाखाली एका पेटीत रोख रक्कम लपवून ठेवली होती. आतापर्यंत एकूण 6 कोटी ऊपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दसरी नरेंद्र यांची त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर महापालिकेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
तेलंगणातील निजामाबाद महानगरपालिकेचे प्रभारी अधीक्षक आणि महसूल अधिकारी दसरी नरेंद्र यांच्या निवासस्थानी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला होता. या छाप्यात रोख रक्कम आणि दागिन्यांचे घबाड सापडल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि आईच्या खात्यात एकूण 1.10 कोटी ऊपयांची शिल्लक सापडली. आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत सुमारे 6.07 कोटी ऊपये आहे.
बेहिशेबी मालमत्तेबद्दल त्याच्याविऊद्ध नोंदवलेल्या खटल्याचा एक भाग म्हणून टाकलेल्या छाप्यांमध्ये त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्राsतांपेक्षा खूप जास्त मालमत्ता उघडकीस आली. छाप्यानंतर नरेंद्र याला अटक करण्यात आली असून त्याला हैदराबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नरेंद्र विऊद्धचा खटला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत येत असून विशेषत: कलम 13(1)(बी) आणि 13(2) ला अनुसरून आहे. आता अतिरिक्त मालमत्ता जप्त करण्यासाठी एसीबी पुढील शोध घेत आहे.