For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kagal News | कागल तालुक्यात जलसंकटाचे सावट; पाझर तलावांनी गाठला तळ

01:51 PM Jun 17, 2026 IST | NEETA POTDAR
kagal news   कागल तालुक्यात जलसंकटाचे सावट  पाझर तलावांनी गाठला तळ
Advertisement

सेनापती कापशी -कागल तालुक्यातून दूधगंगा बेदगंगा आणि चिकोत्रा या तिन्ही नया बाहत असल्या तरी या नद्या ज्या धरणांवर अवलंबून आहेत, त्या धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पाण्याची मागणी बाढत आहे. कागल तालुक्यातील छोट्या मोठ्या पाझर तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली तरी चालू परिस्थिती पाहता पोटात गोळा आणणारी आहे.मागील आठवड्यात कागल तालुक्यातील सर्व भागांमध्ये वळीवाच्या पावसाने दमदार हजेरीलावली होती.

Advertisement

कागल पूर्व भागात तर मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग पेरणीची घाई करून दोन-तीन दिवसांमध्ये बहुतांशी पेरण्या करून घेतल्या आहेत. पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने या पेरण्या बाया जाण्याची शक्यता आहे. कागल तालुक्यामध्ये ज्या गावांना शेतीसाठी नदीतून पाणीपुरवठा नाही, अशा गावातील सोयाबीन, भुईमूग पिकाच्या पेरण्या बाया गेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी देण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पाणी देऊन पिकाचे रक्षण केले. मात्र असाच उन्हाचा तडाखा बाढू लागला तर उगवलेली पिकं ही धोक्यात आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.