For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मगरीच्या आकाराचे शूज

06:32 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
मगरीच्या आकाराचे शूज
Advertisement

सध्याच्या काळात चित्रविचित्र प्रकार फॅशन म्हणून समोर येत आहेत. आता बाजारात चक्क मगरीच्या आकाराचे शूज आले आहेत. मगरीच्या आकारातील शूजचा व्हिडिओ आता जोरदार प्रसारित होत आहे. हे मगरीच्या आकारातील शूज तयार करण्याची नेमकी काय गरज होती असा प्रश्न सोशल मीडिया युजर्स विचारत आहेत.

Advertisement

या विचित्र फॅशनवर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हीही असे शूज कधीही पाहिले नसतील. एक व्यक्ती मगरीच्या आकाराचे शूज परिधना करून चक्क मेट्रोमधून प्रवास करत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून येते. शूज पाहून लोक चकित झाले आहेत. अशाप्रकारची विचित्र फॅशन कुणाला सुचली असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर आता शेअर करण्यात आला आहे. हे काय आहे अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यातआली आहे. अवघ्या सात सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2.2 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला  लाइक केले आहे. युजर्स या व्हिडिओवर कॉमेंट्स करून आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही लोकांनी डेंजरस शूज अशी कॉमेंट केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.