For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माटोळी मलप्रभा नदीत मगरीचा वावर : शेतकऱ्यांत घबराट

10:49 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
माटोळी मलप्रभा नदीत मगरीचा वावर   शेतकऱ्यांत घबराट
Advertisement

तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

सौंदत्ती तालुक्यातील माटोळी, होसूर व मल्लूर गावच्या जवळच्या मलप्रभा नदीत गावच्या शेतकऱ्यांना दोन चार मगरीचे दर्शन झाल्याने माटोळी परिसरातील गावच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मलप्रभा नदीकिनारी मगर आलेली तसेच निस्तेज अवस्थेत असलेल्या मगरींचा व्हिडीओ युवकांनी गावात व्हायरल केला आहे. शेतीच्या कामानिमित्त नदीकाठच्या सभोवती वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितीला धोका निर्माण झाला आहे. सौंदत्ती पोलिसांनी गावच्या जॅकवेल गोरवनकोप्प, पटीयाळ गावच्या शेतकऱ्यांना नदीकाठावर कोणीही जाऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. माटोळी गावच्या शेतकऱ्यांनी रविवारी नदीकिनारीहून शेताकडे जात असताना पाण्याच्या कडेला पाच ते सहा फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे ते भयभीत होऊन तेथून पसार झाले. मलप्रभा नदीशेजारी माटोळी गावच्या शेतकऱ्यांची शेती अधिक असून शेतकऱ्यांना ये-जा करताना द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन मगरींचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.