कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Crocodile In Konkan: पुराचे पाणी ओसरताच शेतात अडकली मगर, 12 फुटी मगर पिंजऱ्यात जेरबंद

05:53 PM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रकृती ठणठणीत असल्याची खात्री करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

Advertisement

चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पुराच्या पाण्यातून आलेली आणि पूर ओसरल्यानंतर कळंबस्ते येथील शेतात अडकलेली १२ फूट लांबीची मगर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात पकडून तिची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली. कळंबस्ते येथील शेतकरी प्रशांत घोरपडे यांना शेतात मगर असल्याचे कळल्यानंतर त्यांनी वन विभागास कळवले.

Advertisement

त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व सर्पमित्रांच्या मदतीने मगर पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर तिची प्रकृती ठणठणीत असल्याची खात्री करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बचाव कार्यात रामपूर वनरक्षक राहुल गुंठे, फिरते पथकाचे वत्ताराम सुर्वे, विशाल पाटील, प्रणित कोळी, कुमारपवार, वाहन चालक नंदकुमार कदम, संजय अंबोकर, सचिन भैरवकर, सर्पमित्र शिवराज शिर्के, प्रणित काळकुटकी, प्रथमेश पवार, सुरेंद्र भोंडवे यांनी सहभाग घेतला.

पाचाडमध्ये गोठ्यात आढळला अजगर

पाचाड येथे सहदेव चिले यांच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यामध्ये तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर आढळून आले. चिले यांनी याची माहिती वन विभागास दिल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान, वनरक्षक राहुल गुंठे, वाहन चालक नंदकुमार कदम, सर्पमित्र प्रथमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या पथकाने अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्याची लांबी अंदाजे ८ ते ९ फूट होती.

Advertisement
Tags :
#chiplun#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaCrocodile foundCrocodile In Konkan
Next Article