For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगलीत दुर्मिळ घटना; उसाच्या शेतात मगरीची विण, ९ पिलांचा मृत्यू

12:03 PM Jun 08, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत दुर्मिळ घटना  उसाच्या शेतात मगरीची विण  ९ पिलांचा मृत्यू
Advertisement

सांगली - सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरातील अनुगडेवाडी येथे एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. काळ्या ओढ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात मगरीने विण केली असल्याचे आढळून आले. मात्र या विणीतील ९ पिलांचा मृत्यू झाला असून, ५ पिलांना वनविभागाने सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.

Advertisement

रविवारी सकाळी शेतात सोयाबीन भांगलणीचे काम सुरू असताना काही महिलांना मगरीचा वावर दिसून आला. परिसराची पाहणी केली असता मगरीची काही पिलं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली.

माहिती मिळताच वनविभागाचा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. प्राथमिक तपासात उष्माघातामुळे पिलांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत पिलांना शेताजवळच दफन करण्यात आले, तर जिवंत असलेल्या ५ पिलांना काळजीपूर्वक जवळील ओढ्यात सोडण्यात आले.

Advertisement

दरम्यान, बाळंतीण मगर सुखरूप असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Advertisement
Tags :

.