क्रोएशियाच्या विटोमरचा विक्रम
29 मिनिटे 3 सेकंदांपर्यंत पाण्यात रोखून धरला श्वास
पाण्यात तुम्ही 29 मिनिटांपेक्षा अधिक काळापर्यंत श्वास रोखून धरू शकता का? याचे उत्तर कुणी नाही असेच देईल. परंतु क्रोएशियाचा 40 वर्षीय फ्रीडायवर विटोमीर मारिसिकने हे करून दाखविले आहे. पाण्यात श्वास रोखून 29 मिनिटे आणि 3 सेकंदापर्यंत तो राहिला आणि गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.
विटोमिर एका हॉटेलच्या स्वीमिंग पूलमध्ये चेहरा नीट करून बसून राहिला. तर पाण्यावरील हिस्स्यात त्याचे डॉक्टर आणि मित्र चिंतेत वेढलेले होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठिण क्षण होता, वेदना प्रचंड होत्या, तरीही हार मानलो नाही, असे क्रोएशियाच्या मारिसिक यांनी सांगितले आहे.
ओपाटिजा शहरातील एका हॉटेलच्या स्वीमिंग पूलमध्ये हा चमत्कार झाला. मारिसिकने प्रयत्नापूर्वी 10 मिनिटांपर्यंत शुद्ध ऑक्सिजनमध्ये श्वसन पेले, जेणेकरून रक्तात अधिक ऑक्सिजन भरेल. यानंतर तो स्वीमिंग पूलमध्ये उतरला, त्याच्या शरीराने शेकडोवेळा झटके दिले, मेंदूनही साथ सोडण्याचा प्रयत्न केला होता. सर्व काही अवघड वाटत होते, प्रयत्न सोडून द्यावा असे वाटले, परंतु पाण्याच्या वर आल्यावर सर्वांकडून टाळ्या वाजल्याचे मारिसिक सांगतात.
श्वसनाच्या आजाराच्या उपचारात मदत
या विक्रमावेळी डॉक्टर इगोर बार्कोविच उपस्थित होते, ते हायपरबॅरिक मेडिसीनचे तज्ञ आहेत. हा प्रकार आधुनिक चिकित्सेसाठी नवा आहे, माणूस पाण्यात ऑक्सिजनशिवाय इतका वेळ राहू शकतो हे आम्ही जाणत नव्हतो. परंतु रुग्णांसाठी हा प्रकार आशेचा नवा किरण ठरू शकतो, असे इगोर यांनी सांगितले.
फ्रीडायविंग काय आहे.
फ्रीडायविंगचा अर्थ श्वसनाच्या उपकरणाशिवाय खोल पाण्यात उतरणे. मारिसिक क्रोएशियाच्या इंटरनॅशनल फ्रीडायविंग बॉडीचे ब्रँच हेड आहेत. मारिसिक आता रशियाच्या एलेक्सी मोलचानोव यांचा विक्रम मोडण्याची तयारी करत आहेत. मोलचानोव यांनी वेरिएबल वेट फ्रीडाइवमध्ये 156 मीटर खोली गाठली होती.