जनतेची दिशाभूल करणे हेच आ. वैभव नाईक यांचे काम
भाजपा सुकळवाड विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी सुनावले ; म्हसकर, भालेकर यांचा पक्षप्रवेश केवळ दिखावा
मालवण | प्रतिनिधी :
जनतेची दिशाभूल करण्याचेच काम आ. वैभव नाईक यांनी नेहमीच केले. आता निवडणूकीच्या तोंडावर काही पक्षप्रवेशाचा दिखावा त्यांच्या माध्यमातून सुरु आहे. यातील बहुतांश हे उबाठा सोबतच अनेकवेळा दिसून आले. त्यांचेच प्रवेश घेण्याचे काम सुरु आहे. सुकळवाड येथील प्रसाद भालेकर यांचाही प्रवेश तसाच आहे. हा वैभव नाईक यांचाच कार्यकर्ता आहे. तर सुभाष म्हसकर भाजपचा माजी उपसरपंच होता परंतु तो अनेक वर्षे राजकारणात सक्रिय नाही आणि ते या अगोदर सुध्दा विरोधीच काम करत होते असा हल्लाबोल भाजपा सुकळवाड विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी केला आहे.
महायुती भक्कम आहे. महायुती मध्ये सुकळवाड गावामध्ये लोकसभेला जे वातावरण होते त्याहीपेक्षा अधिक चांगले वातावरण आता झाले आहे. सुकळवाड गावातून जे लीड लोकसभेला राणे साहेबांना दिले त्याहीपेक्षा जास्त लीड निलेश राणे यांना मिळणारच यासाठी सर्वजण एकसंघपणे कार्यरत आहेत. सुकळवाड गावातील मतदार हे निलेश राणे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भारतीय जनता पक्षाचे सुकळवाड गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे निलेश राणे साहेब यांचे एकमताने आणि एकदीलाने काम करत आहेत. महायुती मजबूत आहे. असे असल्याने पराभवाची चाहूल दिसू लागल्याने आ. नाईक दिशाभूल प्रवेश घेत आहेत. वैभव नाईक यांच्याकडून आमिष दाखवून मतदार फोडण्याचेही काम चालू आहे. परंतु ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत. निलेश राणे साहेब यांचा विजय हा मोठया मताधिक्याचा आणि लक्षवेधी असेल. असा विश्वास चेतन मुसळे यांनी व्यक्त केला.