नम्रपणाचा आव आणून साईभक्त असल्याचा दिखावा करु नये
किती घोषणांची पूर्तता केलीत ते सांगा ; परशुराम उपरकरांचा मंत्री केसरकरांना टोला
सावंतवाडी | प्रतिनिधी
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या तीन्ही निवडणूकांमध्ये ज्या-ज्या घोषणा दिल्या त्यापैकी किती घोषणांची पुर्तता केली हे आमच्यासमोर येऊन सांगावं . नुसता नम्रपणाचा आव आणून आपण साई भक्त असल्याचा दिखावा करु नये असा टोला माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी लगावला.विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेवून जिल्हयात घोषणांचा पाऊस पडत आहे तसेच मोठया प्रमाणावर कामांची उद्घाटने केली जात आहेत ही उद्घाटने जिल्हयाच्या विकासासाठी अथवा जनतेच्या भल्यासाठी नसून त्यातून मिळणा-या दक्षिणांसाठी आहेत.निवडणूकीत मोठया प्रमाणावर पैसे वाटता यावेत यासाठीच हा सर्व खाटाटोप सुरू आहे. अशी टिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी केली. सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते . यावेळी अशिष सुभेदार,मंदार नाईक आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले,विधानसभा निवडणूका डोळयांसमोर ठेऊन जिल्हयात व सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून मोठमोठया घोषणा केल्या जात आहेत मोठया प्रमाणावर कामांची उद्घाटने होत आहेत ही उद्घाटने जनतेच्या विकासासाठी नसून त्यातून मिळणा-या दक्षिणेसाठी केली जात आहेत.याच दक्षिणामधून निवडणूकीत मतदारांना पैशांचे वाटप करता यावे यासाठी हा सर्व खटाटोप केसरकर करत आहेत तर बहुतांशी विकास कामे स्वतःच्या स्वार्थासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता केली जात असून आपल्या जमिनीत गाडी जावी यासाठी केसरी येथे ब्रिज मंजूर केला परंतु ग्रामस्थांच्या काही मागण्या ,जमिन मोबदला यांची पुर्तता न करता ब्रिज बांधण्याची घाई केसरकर यांना झाली आहे त्यामुळेच बावळाट येथे ग्रामस्थांनी उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावला.साईबाबा चांगलं काम करणा-यांना नेहमीच आशिर्वाद देतात पण जी लोक ग्रामस्थांना धुडकावून त्यांना विश्वासात न घेता काम करतील त्यांना साईबाबा कधीच आशिर्वाद देणार नाहीत.केसरकर यांच्या घरासमोर बेरोजगार युवक-युवतींचे आंदोलन सुरु आहे त्यांचे धकीत पगार कंपनीने अद्याप दिलेले नाहीत.ज्या कंपनीने हा प्रकार केला त्यांचे मालक हर्ष साबळे हे गोव्यात केसरकरांना भेटतात मात्र तरीही हा प्रश्न सुटला नाही त्यामुळे केसरकरांनी त्या बेरोजगार युवक-युवतींचे पैसे द्यावेत.जिल्हयात ओला टॅक्सी आणण्याचे काम केसरकर यांनी केले होते मात्र त्याला आम्हीच विरोध केला.आंबोली येथे एमटीडीसीची दोन हॉटेल्स केसरकर यांनी घेवून ठेवली आहेत मात्र आंबोलीतील गेली विस वर्षे असलेल्या काही हॉटेल्सची टेंडर का निघत नाहीत त्या हॉटेलांची भाडी न भरल्यामुळे अवस्था बिकट आहे जनतेच्या पैशातूनच लूट करुन निवडणूक आली की तोच पैसा जनतेला वाटायचा सणांच्या दिवसांत तबला,पेटी,डग्गा,टाळ वाटायचे असे एककलमी कार्यक्रम केसरकर यांचे सुरु आहेत.सलग दोन वेळा मंत्री पदावर राहून स्वतःच्या तुंबडया भरण्याचे काम शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले आहे.मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या नावाखाली केसरकर यांनी सलग दोन वेळा निवडणूका लढवल्या परंतू येथील जनतेला हॉस्पीटल काही मिळाले नाही.ओरोसमध्ये शासकीय मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरु आहेत तर जिल्हा रुग्णालय हलवू नये म्हणून उपोषणे आंदोलने केली जात आहेत.500 कोटींच्या शासकीय मेडीकल कॉलेजसाठी यांचे दक्षिणा मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.शिरशिंगे धरण प्रश्न अद्यापही बाकी आहे त्या धरणाचे काम बोगस झाल्यामुळे ठेकेदाराची एसआयटी चौकशी लावण्यात आली होती या सर्व प्रकारात जनतेचे पैसे वाया गेले आताही पुन्हा त्याच ठेकेदाराला आणून ते काम केले जात आहे.हे सर्व प्रकार टक्केवारीसाठीच सुरु आहेत असा आरोप उपरकर यांनी केला.त्यावेळी नारायण राणे तींबलो व मायनिंगची दलाली करत आहेत अशी टिका केसरकर यांनी केली होती आता ते स्वतः काय करत आहेत हे त्यांनी पहावे ताज वेळागर येथे स्थानिक भुमीपुत्र जमिन मालक यांचा प्रश्न सुटलेला नाही गेले कित्येक दिवस ते आंदोलन करत आहेत तेथे जाण्यास केसरकर यांना वेळ नाही त्यामुळे साईभक्त असून काय उपयोग असे उपरकर म्हणाले.सावंतवाडीमधून विधानसभा निवडणूक अपक्ष लढवावी अशी आपल्या सर्मथकांची मागणी आहे मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय मी घेतलेला नाही निवडणूक लढवणे हा आता पैशाचा खेळ झाला आहे असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.