महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैभव नाईकांनी केलेल्या कामामुळेच राणेंना दारोदारी फिरण्याची वेळ

05:04 PM Nov 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

गौरीशंकर खोत यांची टीका ; घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा

Advertisement

कुडाळ -

Advertisement

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघात केलेली कोट्यवधी रू.ची विकासकामे कामे पाहून नारायण राणे यांना धडकी भरली आहे. आपली घराणेशाही चालण्यासाठी या माजी केंद्रीय उद्योगमंत्र्यांना दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. यातूनच आमदार नाईक यांचे काम बोलत आहे,अशी प्रखर टीका उबाठा शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यानी घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळाव्यात केली. तसेच श्री राणे यांची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आवाहनही त्यांनी कुडाळ-मालवणच्या जनतेला केले. घावनळे येथे संतोष मुंज यांच्या दुकानासमोरील पटांगणात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.सश्री खोत यांच्यासह आमदार वैभव नाईक, काँग्रेस उपतालुकाध्यक्ष संतोष मुंज ,काँग्रेस तालुका सचिव पांडु खोचरे,घावनळेचे माजी सरपंच दाजी धुरी, माजी उपसरपंच प्रभाकर खोचरे,शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पप्पू महाडेश्वर,सुधीर राऊळ, ग्रा.प.सदस्य सुनिल खोचरे,महेश पालव,सुनिल पारकर,बाबु शेळके,नंदकुमार घाडीगावकर,शेखर सावंत , चंदु जाधव,उदय लाड,दाजी पालव,हनुमंत देसाई,प्रमोद खोचरे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव नाईक म्हणाले, आपण ५ वर्ष मतदारसंघात विकास कामे करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच कामे केली. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच यापुढे देखील द्यावी, असे आवाहन त्यांनी करून राणे कुटुंबीय निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणारे आहेत. जे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहू शकत नाही. ते आपल्या जनतेशी काय प्रामाणिक राहणार आहेत.म्हणूनच जनतेशी एकनिष्ठ न राहणाऱ्या राणे कुटुंबाला आता घरी बसविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. संतोष मुंज म्हणाले, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे भात पिकाला योग्य हमीभाव मिळून भात खरेदी सुरू झाली. शेतकर्‍यांना बोनसही मिळून दिला. शेतकऱ्यांना आमदार नाईक यांच्यामुळे न्याय मिळाला,असे त्यांनी सांगून या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे त्यांनी केलो. त्यामुळे सर्व सामान्यांचे आपला आमदार म्हणून त्यांनाच पसंती आहे.कुडाळ-मालवण मतदार संघाच्या विकासासाठी आमदार म्हणून नाईकच हवेत.त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार करुया.बेसावध राहू नका. घरा - घरापर्यंत मशाल निशाणी पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.त्यामध्ये आमदार वैभव नाईक मंत्री असतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update
Next Article