For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

१ फुल २ हाफ सरकारचे वस्त्रहरण करा - खा.डॉ. अमोल कोल्हे

04:19 PM Oct 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
१ फुल २ हाफ सरकारचे वस्त्रहरण करा   खा डॉ  अमोल कोल्हे
Advertisement

फोटो - अनिल भिसे

Advertisement

राजकोट पुतळा दुर्घटनेवरून खा .अमोल कोल्हेंचा निशाणा

सावंतवाडी

Advertisement

मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे ही केवळ चूक नसून अपराध आहे. आणि या अपराधाला माफी नाही . अजस्त्र लाटांचा तडाखा सोसत छत्रपतींनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही दिमाखात उभा आहे . परंतु , राजकोट येथील पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचे येणाऱ्या निवडणुकीत वस्त्रहरण करा अशी जोरदार टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी सावंतवाडी येथे केली . सावंतवाडी येथील गांधी चौक येथे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते . ते पुढे म्हणाले सावंतवाडीच्या मातीत नतमस्तक व्हावे असे वाटते. कारण याच भूमीतून स्वर्गीय बॅरिस्टर नाथ पै . यांसारख्या नेत्यांनी दिल्लीत मराठी माणसाचा ठसा उमटवला . दिल्लीचे तख्त कोकणातल्या याच मातीतील नेत्यांनी भेदले. शिवरायांचा पुतळा कोसळणे ही चूक नसून अपराध आहे आणि या अपराधाला माफी नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान भ्रष्टाचारी सरकारचे वस्त्रहरण करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Advertisement
Tags :

.