महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुचेलीतील 140 घरांवर संकट

01:04 PM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मशानभूमीच्या जागेवर उभारली घरे : राजूने केला कोट्यावधींचा घोटाळा,घरमालकांची पोलिसांकडे धाव

Advertisement

म्हापसा : कुचेली येथील कोमुनिदादच्या जागेत काही कोमुनिदाद पदाधिकारी, नगरसेवक व वरिष्ठ राजकारणी यांच्या आशीर्वादाने सुमारे 20 हजार चौ.मी. जागेत काही नागरिकांना प्रत्येकी 150 चौ.मी. जागेत घरे उभारण्यास देण्यात आली होती. कोमुनिदादमधील गॉडफादरना हाताशी धरून तेथे त्यांनी घरे उभारली खरी मात्र चार दिवसांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जागेची मोजणी केल्याने या घरमालकांची बरीच धावपळ उडाली असून याबाबत म्हापसा पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. कोमुनिदादच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जागेसाठी 5 ते 6 लाख रुपये उकळले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे येथे 7 कोटीचा घोटाळा झाल्याचे चित्र असून राजू नामक इसमाने हे पैसे उकळल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत लेखी तक्रार नागरिकांनी म्हापसा पोलिसस्थानकात दिली आहे. कोमुनिदादच्या जागेत आम्हाला घरे देऊन आमच्याकडून कोट्यावधी ऊपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे बेकायदेशीर जागा वाटप करताना राजू नामक इसमाने प्रत्येकाकडून 5 ते 6 लाख उकळले असून 140 जणांना येथे घरे बांधण्यासाठी जागा दिली आहे. त्यानुसार ही घरे काही वर्षापूर्वी उभारण्यात आली होती.

Advertisement

स्मशानभूमीसाठी राखीव जागा 

ही जागा कोमुनिदादची असल्याने सरकारने ती स्मशानभूमी उभारण्यासाठी राखीव ठेवली होती. त्यानुसार याठिकाणी एका छताखाली सुमारे 20 हजार चौ.मी. जागेत चार भल्या मोठ्या स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चनांच्या स्मशानभूमींचा समावेश आहे. त्यानुसार सरकारी यंत्रणेने येथे जागेचे मोजमाप करण्यासाठी अधिकारीवर्ग पाठविला असता राजू नामक पैसे उकळणाऱ्याचे भींग फुटले आहे. त्यामुळे आता हा घोटाळा उघडकीस आला आहे.

कागदपत्रे नसताना उभारली घरे 

या नागरिकांकडे लेखी स्वऊपात काहीच कागदपत्रे नाहीत असे आढळून आले आहे. पैसे घेऊनही आपली फसवणूक केल्याचे समजल्यावर सर्व नागरिकांनी काल मंगळवारी त्या राजूच्या घरी धाव घेतली. मात्र राजूने घराचे दार बंद करून घेतले. लोक आपल्यास मारहाण करण्यास आल्याचे सांगून पोलिसांना आपल्या घरी पाचारण केले. नागरिकांनी त्याला बरेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाहेर येण्यास राजी नसल्याने सुमारे 200 नागरिकांनी म्हापसा पोलिसस्थानकात धाव घेतली. काही नागरिकांनी मंगळवारी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना घटनेची माहिती दिली. आपण आमदार होण्यापूर्वीचे हे प्रकरण असून सरकारने ही जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवल्याचे आमदारानीही सांगितल्याने येथील 140 घरांवर आता संकट कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article