महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा विकासदर वाढीचा क्रिसिलचा अंदाज

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.8 टक्के राहणार असल्याचे क्रिसिलने आपल्या इंडिया आउटलुक अहवालात म्हटले आहे.  क्रिसिलने निवेदनात म्हटले आहे की, ‘आर्थिक परिणाम (पुढील वर्षी) कमी असेल. याचे कारण पुढील वर्षी राजकोषीय तूट जीडीपीच्या 5.1 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. तथापि, सरकारच्या खर्चाच्या पद्धतीमुळे गुंतवणूक चक्र आणि ग्रामीण उत्पन्नाला थोडासा आधार मिळेल.  महागाईबाबत, रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की चांगल्या कृषी उत्पादनामुळे अन्नपदार्थ, तेल आणि वस्तूंच्या किमती नियंत्रणात असतील आणि पुढील आर्थिक वर्षातही हीच स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्के दराने वाढू शकते आणि भारत उच्च मध्यम उत्पन्नाचा देश बनेल असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन 7 लाख कोटी रुपये होईल. असा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2031 पर्यंत, अर्थव्यवस्थेचे दोन्ही आधारस्तंभ, उत्पादन आणि सेवा क्षेत्रे अतिशय वेगाने विस्तारतील. यातून देशाचा प्रचंड विकास होईल. क्रिसिलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ धरमकीर्ती जोशी म्हणाले की, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी आहेत. ‘आम्ही 2025 ते 2031 या आर्थिक वर्षात उत्पादन आणि सेवा क्षेत्रे अनुक्रमे 9.1 टक्के आणि 6.9 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्पादन क्षेत्राला काहीशी गती मिळाली आहे परंतु सेवा क्षेत्र भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावेल.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article