वारे वसाहतीत गुन्हेगारांकडून हत्यारे नाचवत दुकानाची तोडफोड
कोल्हापूर :
येथील वारे वसाहतीमधील गोकुळ सुपर मार्केट या किराणा दुकानदाराने दुकानात खाऊ घेण्यासाठी आलेल्या लहान मुलाला हटकल्याच्या क्षुल्लक कारणातून वारे वसाहतील पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराच्या टोळक्याने नंग्या तलवारी, कोयते आणि एडके नाचवित सुपर मार्केटची तोडफोड केली. तसेच या घातक हत्यारा धाक दाखवित सुपर मार्केटच्या मालकाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकाराने वारे वसाहतीमध्ये काही काळ या टोळक्याची दहशत पसरली होती. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावऊन पोलिसांनी संशयितांचा तत्काळ शोध सुऊ केला आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली असून, याची फिर्याद दुकानदार खेमाराम पुनाराम चौधरी (वय 42, रा. वारे वसाहत, मेन रोड, बालकल्याण संकुलाजवळ, कोल्हापूर) यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत संशयितांविरोधी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, सुमारे 17 वर्षांपूर्वी वारे वसाहत परिसरात खेमाराम चौधरी यांनी गोकुळ सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान सुऊ केले आहे. या दुकानात खाऊ घेण्यासाठी लहान मुले आली होती. या लहान मुलांना हटकल्याच्या कारणातून वाद सुरुवात झाला. या वादातून वारे वसाहत परिसरातील चार ते पाच जणाचे एक टोळके नंग्या तलवार, कोयते आणि एडके नाचवित दुकानात घुसले. दुकानदार चौधरी याला जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्यानी घातक हत्याराने दुकानाची तोडफोड सुऊ केली. या तोडफोडीत दुकानातील किराणा मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहुल लागताच हल्लेखोरांनी त्वरीत घटनास्थळावऊन पलायन केले. पोलिसांनी झाल्या प्रकाराची माहिती घेवून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार प्रशांत घोलप यांनी हल्लेखोराच्या शोधासाठी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुऊ केली. तपासणीमध्ये दुकानाच्या तोडफोडीचा संपूर्ण प्रकार कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटविली.
या फुटेजमध्ये पोलिसांना दुकानाची तोडफोड करणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋत्विक साठे याच्यासह यश माने आणि मंथन (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या तिघांसह अन्य अनोळखी तऊण तोडफोड करीत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यावऊन या तिघासह त्याच्या अन्य साथिदाराचा पोलिसांनी तत्काळ शोध सुरु केला आहे.
- वारे वसाहतीमध्ये काही काळ तणावपूर्ण शांतता
वारे वसाहत परिसरात गेल्या काही दिवसापासून रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराच्या टोळीने क्षुल्लक कारणातून वाद घालून, दुकानदार, विक्रेत्यांच्यावर दशहत निर्माण कऊन त्यांना त्रास देत, खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पोलिसांनी या टोळीच्या वेळीच मुसक्या आवळल्याव्या, अशी मागणी दुकानदार, विक्रेत्यांकडून होवून लागली आहे. गुऊवारी सायंकाळी या घडल्या प्रकारने वारे वसाहत परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.