Kupwad Police | गुन्हेगारांनो सावधान! कुपवाडमध्ये पोलिसांचे 'कोंबिंग ऑपरेशन', हातात दांडके घेऊन पथक मैदानात
कुपवाड एमआयडीसी पोलिसांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा
कुपवाड -कुपवाड शहर आणि विस्तारित परिसरात गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडून त्यांच कंबरडे मोडण्यासाठी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी सध्या 'धडक मोहीम' हाती घेतली आहे,यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथक हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरले आहेत
.कुपवाड पोलिस ठाण्याच्याहद्दीत गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. कुपवाडकरांना त्रास देण्प्रया आणि दहशत माजवण्प्रया गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिला आहे. कुपवाड परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेँगारांची धरपकडकरण्यासाठी रात्रीच्या वेळी अचानक तपासणी (कोंबिंग ऑपरेशन) केली जात आहे.
पोलिसांनी कारवाईच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांबर बचक निर्माण करण्यासाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगाराना शहरातून किंवा जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार)करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.विनापरवाना वाहने चालवणे, टवाळखोरी करत बिनाकारण फिरण्प्रयांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.
कुपवाड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुपवाड परिसरात तसेच विस्तारित भागात गुन्हेगारांकडून काहीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.भाडेकरू ठेवताना त्यांची माहिती पोलीस ठाण्यात जमा करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठेही गुन्हेगारांचा त्रास होत असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. पोलिस त्यांच्यावर कडक कारवाई करतील. यासाठी तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.