Sangli News : सांगलीतील औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या टाकीवरून पडून गुन्हेगाराचा मृत्यू
सांगलीमध्ये पाण्याच्या टाकीवरून पडून तरुणाचा मृत्यू
सांगली : सांगली येथील औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या टाकीवरून पडल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. राज द्रयाप्पा यादव (वय २५, मूळ रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. चिंतामणनगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राज यादव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दुचाकी चोरीचे गुन्हे त्याच्यावर आहे. त्याची गुन्हेगारीमोडीत काढण्यासाठी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होती. आज सकाळी नऊच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या टाकीजवळ त्याचा मृतदेह दिसून आला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने तो मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
घातपाताचा संशय कुटुंबियांनी घेतले पोलिसांनी तपास सुरू केली. उत्तरीय तपासणीत तो पडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.