पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर :
रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराने पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन कऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. श्रेयश बाळू जाधव (वय 22, रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये तत्काळ दाखल बंदोबस्तात उपचार सुऊ आहेत. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीमध्ये झाली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
श्रेयश जाधवच्या विरोधी करवीर ठाण्यात गंभीर स्वऊपाचा गुन्हा दाखल आहे. या गुह्यातून तो काही महिन्यापूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्याने शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश केला. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना चाहुल लागू न देता विष प्राशन केले. त्यानंतर तो खाली कोसळला. ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याच्या दिशेने धाव घेत त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. माहिती समजताच सीपीआरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे. पण त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन कऊन आत्महत्येचा प्रयत्न का केला. याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या घडल्या प्रकाराने पोलीस अधीक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.