Crime News: रांगोळी ग्रामपंचायत सदस्याचा अपहरण करुन खून, चारजण ताब्यात
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला होता
कोल्हापूर : रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचे अपहरण करुन खून करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका महिलेसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांनी अपहृत बेनाडेचा खून केल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांनी दिली.
लखन बेनाडे आई- वडिलांसह रांगोळी गावातील माळभाग येथे राहत होता. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. पण या निवडणुकीत तो पराभूत झाला. तो 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उभा राहून निवडून आला आहे.
10 जुलैला घरातून निघून गेला तो परत आला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची बहीण नीता तडाखे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला होता. बेनाडे याच्या विरोधात हातकणंगले, इचलकरंजीतील गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ हाती लागला. त्यावरुन तिला पोलिसांनी कोल्हापुरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले. तिच्याकडे बेपत्ता बेनाडे याच्याबद्दल कसून चौकशी सुरु केली.
त्यावरुन तिला पोलिसांनी कोल्हापुरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले. तिच्याकडे बेपत्ता बेनाडे याच्याबद्दल कसून चौकशी सुरु केली. चौकशीमध्ये तिने बेनाडेचे अपहरण करुन त्याला बेळगाव जिल्ह्यात नेऊन काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा खून केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी तिच्या तीन सहकाऱ्यांचा शोध घेऊन गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता बेनाडेचे अपहरण करुन, बेळगाव जिल्ह्यातील एका गावात खून केल्याची कबुली दिली. पण खून नेमका कोठे केला, तो कशाने केला, मृतदेह कोठे फेकून दिला याबाबतची सर्व माहिती संशयितांकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खुनाच्या वृत्ताने रांगोळीत खळबळ
ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेचे अपहरण करुन, त्याचा खून केल्याचे वृत्त गुरुवारी दुपारी रांगोळीत समजले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. तसेच त्याच्या राहत्या घरासमोर माळभागातील नागरिकांनी गर्दी केली होती.
अनैतिक संबंधातून खून?
लखन बेनाडे याचा अनैतिक संबंधातून अपहरण कऊन खून करण्यात आला आहे. हा खून त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने काही तऊणांच्या मदतीने केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.