कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : अमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

11:17 AM Apr 28, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रत्नागिरीत गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Advertisement

रत्नागिरी : शहरालगतच्या उद्यमनगर परिसरात गांजासदृश अमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली. शनिवारी पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून 353 ग्रॅम वजनाचा गांजा, दोन दुचाकी, चार मोबाईल असा मिळून 2 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला.

Advertisement

अत्ताउल्ला सलिम पटेल (35, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), फहाद मुस्ताक पाटणकर (27, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) आणि आयान अजिज मुल्ला (24, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत़ उद्यमनगर येथे अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांकडून या परिसरात गस्त घालण्यात येत होती. 26 एप्रिल रोजी पथकाला पटवर्धनवाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गावर उद्यमनगर येथे दोन दुचाकींवर तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या पोलिसांनी तत्काळ त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात गांजासदृश अमली पदार्थ सापडला. या गांजाचे वजन 353 ग्रॅम इतके होते. संशयितांविऊद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अमित कदम, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्यो, भैरवनाथ सवाईराम, सत्यजित दरेकर आणि महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांच्या पथकाने केली.

Advertisement
Tags :
@ratnagiri#drugs#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime investigationRatnagiri police
Next Article