For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र !

06:01 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र
Advertisement

साधु-संतांची जन्म आणि कर्मभूमी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्याची काही समाजकंटकांनी बदनामी करण्यास सुऊवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात फोफावत चाललेल्या गुन्हेगारीला कायमस्वऊपी आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यानी कठोर पाऊले उचलण्यास सुऊवात केली आहेत. महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करण्याचा चंग मुख्यमंत्र्यानी बांधला असून, त्यासाठी त्यांनी राज्य पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या सत्कार्याला यश येवो या शुभेच्छा!

Advertisement

नवीन वर्षे सुरू होऊन दीड महिना उलटला. राज्यातील विविध ठिकाणी गुन्हेगारीने थैमान घातले आहे. मात्र या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्राची ब्ल्यू]िप्रंट तयार केली आहे. राज्यातील  गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी मुख्यमंत्री स्वत:

अॅक्शन मोडवर आले आहेत. सध्या बीडचा बिहार झाल्याची आवई उठविली गेली आहे. मात्र बीडचाच काय राज्यातील कोणत्याही जिह्याची अथवा गावाची अवस्था बिहारसारखी होणार नाही असा चंग मुख्यमंत्र्यांनी बांधला आहे. मुख्यमंत्री जे ठरवितात ते करतातच. असा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याला लाभल्याने, राज्यातील जनतादेखील खुश आहे. यामुळे जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुऊवात केली आहे. त्यासंदर्भात राज्य पोलीस दलांनादेखील सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Advertisement

2024 सालात अनेक गुन्हेगार आणि गुह्यांनी उचल खाल्ली. या वर्षात गुह्यांची व्याप्ती आणि गुन्हेगारांची विकृतता आढळून आली. मुंबई, पुणे आणि बीडमध्ये सूडनाट्यांच्या अक्षरश: ठिणग्या उडालेल्या दिसल्या. एका माजी राज्यमंत्र्याची हत्या झाली तर सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर भर पहाटेच्यावेळी गोळीबार करण्यात आला. तसेच एका आमदाराने पोलीस ठाण्यातच अंदाधुंद गोळीबार करून एका माजी नगरसेवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात दोन माजी नगरसेवक, एक माजी मंत्री आणि तीन सरपंच अशा अर्धा डझन लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या.

2024 च्या पहिल्याच आठवड्यात खून, खुनाचा प्रयत्न आदी बऱ्याच गुह्यांत सहभागी असलेल्या आणि जेलमधून बाहेर आलेल्या शरद मोहोळ या पहेलवान गुंडाची कोथऊड येथील त्याच्या घराजवळ 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळच्या हत्येची चर्चा सुरू असतानाच मुंबईतील बोरिवली (प.) आयसी कॉलनीमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या माथेफिरूने आपल्या कार्यालयात बोलावून गोळ्या घालून हत्या केली. अभिषेकला मारल्यानंतर मॉरिसने स्वत:च्या कानशिलात एक गोळी झाडून स्वत:ही आत्महत्या केली.

कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले गणपत काळू गायकवाड यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी कल्याणच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार गायकवाड यांना अटक करण्यात आली. 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4.45 वाजता प्रख्यात सिने अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट या निवासस्थानी पंजाबचा बडा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्या इशाऱ्यावरून गोळीबार करण्यात आला. परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या वेळी घराबाहेर गोळीबार करून पळालेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या यूपी-बिहारच्या बेकार तऊणांना मुंबई क्राइम ब्रँचच्या वांद्रे युनिटने गुजरातच्या भुज येथे धाड घालून अटक केली. त्यानंतर पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसजवळ सलमानवर पाळत ठेवणाऱ्या कटात सामील असलेल्या दीड डझन आरोपींना अटक केली.

त्यातच बदलापूर येथे एका शाळेत अक्षय शिंदे या विकृताने शाळेतील चार ते सहा वयोगटातील दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यावर बदलापूरात जनक्षोभ उसळला. लोकांनी 10 तास रेल्वे रोखली. शहर बंद पाडले. त्यानंतर अक्षय शिंदेला 23 सप्टेंबर 2024 रोजी तपासाला नेत असताना मुंब्य्dराजवळ अक्षय शिंदे याने पोलिसाची बंदुक हिसकावित त्यांच्यावर गोळीबार केला. त्या प्रत्युत्तरादाखल संजय शिंदे या पोलीस निरीक्षकाने अक्षय शिंदेवर गोळ्या घातल्या. परंतु ही कथित चकमक वादग्रस्त ठरली. न्यायालयाने सीआयडी चौकशीचे आदेश देत पोलिसांनाच दोष दिला. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या कल्याणच्या विशाल गवळी या सीरियल किलर नराधमाला पोलिसांनी चकमकीत ठार मारण्याचे धाडस केले नाही. ही संतापजनक घटना ताजी असतानाच 25 जुलै 2024 रोजी उरण शहरातील पदवीधर तऊण मुलगी यशश्री शिंदे हिची तिच्या शाळेतील दाऊद शेख या तऊणाने लग्नास नकार दिला म्हणून अत्यंत क्रूररीत्या हत्या केली.

पुण्यात गँगवॉरचा पुन्हा भडका उडाला. एकेकाळचा पुण्याचा बडा गँगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू आंबेकर (68) याचा नगरसेवक असलेला मुलगा वनराज आंबेकर याची त्याच्याच कुटुंबियांनी मालमत्तेच्या वादातून कोयता गँगला सुपारी देऊन हत्या केली. ज्या बिष्णोई टोळीने सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केला होता, त्याच टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्दिकी ऊर्फ बाबा सिद्दिकी (66) यांची वांद्रे पूर्व निर्मलनगर येथे 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येप्रकरणी लॉरेन्सचा भाऊ अनमोल यास अमेरिकेत तर अन्य 26 आरोपींना उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब व महाराष्ट्रातील डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, अकोला, अंबरनाथ आदी भागांतून मुंबई क्राइम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.  बीड हा संत भगवान बाबा यांचा वारसा असलेला जिल्हा, केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूररीत्या हत्या करण्यात आली, तर परळी तालुक्यातील मरळ वाडीतील सरपंच बापू आंधळे यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 23 दिवस फरार असलेला वाल्मीक कराड हा आरोपी पुणे सीआयडी पोलिसांना 31 डिसेंबर रोजी शरण गेला. या सर्व प्रकरणामुळे अॅक्शनमोडवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करण्याचा चंग बांधला असून, त्यांच्या या कार्याला लवकर यश मिळो या शुभेच्छा!

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.