महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संदेशखाली प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एफआयआरमध्ये पाच मुख्य आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सीबीआय तपास यंत्रणात आता कारवाईच्या मोडमध्ये दिसत आहे. जमीन बळकावणे आणि महिलांच्या छेडछाडीशी संबंधित गुह्यांबाबत सुरू असलेल्या तपासासंदर्भात पाच मुख्य संशयितांसह इतर अज्ञातांविऊद्ध सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपासाच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून संदेशखाली परिसरातील अनेक कथित गुह्यांचा तपास सीबीआयकडे घेण्याचे निर्देश दिले होते. या गुह्यांमध्ये बेकायदेशीर भूसंपादन आणि महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक छळाचा समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखाली येथील लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याच्या कथित प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी उत्तर 24 परगणा जिह्यातील संदेशखाली येथील महिला सत्ताधारी टीएमसी आणि त्यांचे नेते शाहजहान शेख यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. शाहजहान आणि त्याच्या साथीदारांवर अत्याचार आणि त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article