For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री आतिशी यांनाही गुन्हे शाखेची नोटीस

06:17 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री आतिशी यांनाही गुन्हे शाखेची नोटीस
Advertisement

रविवारी पहाटेच पथक पोहोचले घरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावल्यानंतर रविवारी दिल्ली पोलीसही नोटीस देण्यासाठी शिक्षणमंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्ली पोलिसांचे पथक आतिशी यांच्या निवासस्थानातून परतले असून त्यांना दोन दिवसात नोटिसीला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. यापूर्वी केजरीवाल यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना आमिष दाखवून आपल्याकडे ओढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्याकडून तीन दिवसात उत्तर मागितले आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल आणि आतिशी यांनी भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा गंभीर आरोप केला होता. दिल्लीतील त्यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने आपल्या सात आमदारांना प्रत्येकी 25 कोटी ऊपयांची ऑफर दिल्याचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. भाजपने दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस 2.0’ सुरू केल्याचा आरोप केला. ‘आप’च्या आमदारांना पैशांची ऑफर देऊन जिंकण्याचा त्यांनी गेल्यावषी असाच प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.