For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

12:16 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकावर गुन्हा
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

तालुक्यातील एका शाळेत शिक्षकाने शालेय विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीनंतर त्या शिक्षकाच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सबंधित शिक्षक हा त्या शाळेतील अल्पवयीन मुलींची छेड काढण्याचा प्रकार वारंवार करीत होता. त्यामुळे मुलींनी हा प्रकार आपापल्या पालकांना सांगितला. पालकांनी याबाबत शिक्षका विरोधात संस्थाचालकांकडे तक्रार केली होती. अखेर पालकांनी त्या शिक्षका विरोधात छेड काढल्याची तक्रार दिल्यावरून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा शिक्षक हा मूळचा घाटमाथ्यावरील आहे असे समजते.अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.