For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आप आमदारासह पुत्राविरोधात गुन्हा

06:21 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आप आमदारासह पुत्राविरोधात गुन्हा
Advertisement

पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकरण  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या पुत्राने नोएडा येथील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून अमानतुल्ला खान आणि त्यांच्या मुलाविऊद्ध मंगळवार 7 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अमानतुल्ला खान यांचा मुलगा नोएडातील एका पंपावर ब्र्रेझा कार घेऊन इंधन भरण्यासाठी आला होता. यावेळी रांगेत थांबण्याऐवजी मध्येच घुसून आपल्या गाडीत पेट्रोल भरण्याचा आग्रह त्याने केला. कर्मचाऱ्याने नकार दिल्याने त्याच्यासह सहकाऱ्यांनी पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. आप आमदाराच्या मुलाने कारमधून लोखंडी रॉड काढून सेल्समनला मारहाण करण्यास सुऊवात केली. काही वेळाने प्रकरण शांत झाल्यानंतर आमदार अमानतुल्ला खान हे दोन वाहनांतून आपल्या समर्थकांसह पेट्रोल पंपावर पोहोचले आणि त्यांनी पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांशी मोठा वाद घातला. हे प्रकरण भडकल्यानंतर आप आमदारासह त्यांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.