For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्तासह पाच जणांवर गुन्हा; पत्नीचा छळ केल्याचा गंभीर आरोप!

04:47 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्तासह पाच जणांवर गुन्हा  पत्नीचा छळ केल्याचा गंभीर आरोप
Advertisement

                        प्रेमविवाहानंतर सासरच्यांकडून हुंड्याची मागणी

Advertisement

कोल्हापूर : पत्नीचा छळ केल्याप्रकरणीसहाय्यक कामगार आयुक्त निलेश लक्ष्मण येलगुंडे (वय ४२, रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यासह नात्यातील पाच जणांवर राजारामपुरी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. १० वर्षांपासून पती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली, असा उल्लेख प्राध्यापक पत्नीने दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

पतीसह सासरा लक्ष्मण प्रल्हाद येलगुंडे, सासू सुवर्णा लक्ष्मण येलगुंडे, नणंद नम्रता येलगुंडे (तिघे रा. लांबोटी) आणि मावस दीररावसाहेब नरोटे (रा. पोखरापूर, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना पती निलेश यांच्याशी ओळख झाली. दोघांच्या सहमतीने प्रेमविवाह केला. लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला.

Advertisement

पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. म्हणून आपण मुलगीसह दुसऱ्या ठिकाणी राहत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला असून पतीसह पाच जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Advertisement
Tags :

.